रिअल इस्टेट एजंट्ससाठी ठाण्यात मोफत सेमिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिअल इस्टेट एजंट्ससाठी ठाण्यात मोफत सेमिनार
रिअल इस्टेट एजंट्ससाठी ठाण्यात मोफत सेमिनार

रिअल इस्टेट एजंट्ससाठी ठाण्यात मोफत सेमिनार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : रिअल इस्टेट व्यवसायात आपले करिअर करणाऱ्या प्रत्येकाला आता महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार ‘एसआयआयएलसी’च्या माध्यमातून ठाण्यातील रिअल इस्टेट एजंट्स यांच्यासाठी मोफत महारेरा प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

घर, जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीसंदर्भात ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकालाच महारेरा प्रमाणपत्र प्रशिक्षण करणे बंधनकारक आहे. या माध्यमातून रिअल इस्टेट एजंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्याबरोबरच रिअल इस्टेट कन्सल्टंट व्यवसायाला कायदेशीर व्यासपीठावर आणण्याचा उद्देशाने एसआयआयएलसीच्या माध्यमातून ठाणे शहरातील रिअल इस्टेट एजंट्स यांच्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे सेमिनार ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात १६ मार्च रोजी दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत पार पडणार आहे. यावेळी ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र मेहता आणि महारेरा प्रणित प्रशिक्षक अभयकुमार हे रियाल इस्टेट एजंट्सना मार्गदर्शन करणार आहेत. एसआयआयएलसीला एमपॅनल्ड ट्रेनिंग प्रोव्हायडर (ऑथोराइज्ड ट्रेनिंग पार्टनर) म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार या प्रशिक्षणाचा ऑनलाईन, ऑफलाईन, हायब्रीड अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
---
सेमिनारविषयी
ठिकाण ः .ठाणे महापालिकेचे नरेंद्र बल्लाळ सभागृह.
वेळ ः दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वाजता गुरुवार १६ मार्च

...................
महारेराच्या महत्त्वाच्या सूचना
- विद्यमान रिअल इस्टेट एजंटने पूर्वी महारेरा रिअल इस्टेट एजंटचे सक्षमतेचे प्रमाणपत्र प्राप्त करून अपलोड करावे.
- रिअल इस्टेट प्रकल्पाचे प्रवर्तक हे ग्राहकांना महारेराचे सक्षमतेचे प्रमाणपत्र असलेल्या एजंटची नावे व पत्ते ग्राहकांना देतील.
- रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये घर खरेदी किंवा वाटप करण्याचे काम करणाऱ्यांना देखील कायदेशीर प्रशिक्षण आवश्यक ठरणार आहे.
..............
का आहे प्रशिक्षणाची आवश्यकता?
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घर घेणे ही बाब महत्त्वाची असते. घर खरेदी करताना किंवा वाटप करताना चुका झाल्यास बांधकाम व्यावसायिक व ग्राहक दोघांचेही नुकसान होते. अनेकदा व्यावसायिक व ग्राहक यांना जोडणारा एजंट हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे रिअल इस्टेटचा व्यवसाय करताना या तीनही घटकांमध्ये विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एजंटला बांधकाम व्यवसाय संदर्भात कायदेशीर ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हा घटक सक्षम झाल्यास रिअल इस्टेट व्यवसायात अधिक पारदर्शकता येऊन कायदेशीर ज्ञान असलेल्या इस्टेट एजंट ला महत्त्व प्राप्त होणार आहे.