पारंपरिक बोहाडा-जगदंबा यात्रोत्सव जल्लोषात

पारंपरिक बोहाडा-जगदंबा यात्रोत्सव जल्लोषात

विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथे गावकऱ्यांच्या अनेक बोली भाषांतील बोहाडा म्हणजेच परंपरागत जगदंबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोशात रंगपंचमीच्या दिवशी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा यात्रात्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. या वेळी रात्री ते पहाटपर्यत ५२ देवदेवतांची सोंगे नाचवण्यात आल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले.
या यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह अनेर मान्यवर व्यक्तींनीही भेट दिली. त्यांचे या वेळी मंडळाकडून स्वागत करण्यात आले. स्वंतत्र इतिहास असणारी या गावकऱ्यांची संस्कृती ही मानवी मुल्यांवर आधारित आहे. येथील लोककलेला फार महत्त्व आहे. पारंपरिक नृत्यकलेमध्ये तारपा, ढोलनाच, टपरीनाच, तुरनाचाद्वारे येथील आदिवासी व्यक्त होत असतात. तसेच अनेक बोली भाषाही आहेत. त्या संस्कृतीमधील बोहाडा पाहण्यासाठी वेहलपाड्याच्या तसेच तालुक्यातील पंचक्रोशीतील लोक रात्री कोसो मैल दुरवरून चालत हा बोहाडा पाहण्यासाठी येतात. या वेळी अनेक दुकानदारांनी वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल लावलेले होते.

--------------------
पौराणिक कथांचे सादरीकरण
यात्रोत्सवात आयोजित केल्याप्रमाणे १० मार्च रोजी थाप, ११ मार्च रोजी लहान बोहाडा साजरा करण्यात आला; तर १२ मार्च रोजी मोठा बोहाडा असा रात्री ८ पासून सकाळी ८ पर्यंत या तीन दिवसात हा बोहाडा जगदंबा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व जल्लोशात साजरा करण्यात आला. बोहाडा यात्रोत्सवात रामायण, महाभारत आदी पौराणिक ग्रंथातील देव-देवतांची निवड करून ग्रामस्थ ठरल्याप्रमाणे घरच्याघरी लाकुड, चिकणमाती या वस्तूंपासून आकर्षक हुबेहुब देवतांचे मुखवटे तयार केले जातात. देवदेवतांनुसार या मुखवट्यांना पोशाख घालून आणि रीतिरिवाजाप्रमाणे व परंपरेनुसार मशालीच्या उजेडात, तालबद्ध वाजंत्रीच्या तालावर रात्री आठ ते सकाळी आठ या दरम्यान हा बोहाडा यात्रोत्सव सोंगे नाचवून साजरा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com