दिवंगत झुजू कुलास यांची जन्मशताब्दी साजरी

दिवंगत झुजू कुलास यांची जन्मशताब्दी साजरी

वसई/विरार, ता. १५ (बातमीदार) : सहकार, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केलेले दिवंगत झुजू कुलास यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. आदर्श किसान विविध कार्यकारी सोसायटी, शेतकरी सहकारी कंझ्युमर सोसायटी, वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटी, वसई तालुका सहकारी मुद्रणालय, लोकसेवा मंडळ बंगली व म. वि. कुलकर्णी ट्रस्ट यांच्या वतीने लोकसेवा मंडळ सभागृह, बंगली येथे हा कार्यक्रम घेण्यात आली. या वेळी माजी आमदार डॉमनिक गोन्साल्विस, वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटीचे अध्यक्ष रोहन गोन्साल्विस, शेतकरी सहकारी कंझ्युमर सोसायटीचे अध्यक्ष जॉर्ज डायस, वसई तालुका सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष लेस्ली गोन्साल्विस, डेल्सी फलकांव, आदर्श किसान विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष युरी गोन्साल्विस, सेंट थॉमस चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर थॉमस लोपीस, हरित चळवळीचे नेते मार्कस डाबरे व विल्सन आल्मेडा उपस्थित होते. सूत्रसंचालन गॉडफ्री कोरिया यांनी केले; तर आभार डॉमनिक डाबरे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com