Wed, June 7, 2023

कळंबोलीत हुक्का पार्लरवर कारवाई
कळंबोलीत हुक्का पार्लरवर कारवाई
Published on : 15 March 2023, 9:15 am
नवीन पनवेल (वार्ताहर)ः रोडपाली येथील संचित टॉवरमधील बिग बॅास हुक्का पार्लरवर केलेल्या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कळंबोली पोलिसांनी १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप गुजर यांना रोडपाली येथे विनापरवाना हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच या ठिकाणी रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा चालू असतो. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने हा पार्लर कायमचा बंद करावा, अशी मागणी केली जात आहे.