पदपथांवर मद्यपींचे घोळके

पदपथांवर मद्यपींचे घोळके

घणसोली, ता.१५ (बातमीदार)ः सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई असतानाही कोपरखैरणेत वर्दळीच्या परिसरात उघड्यावर दारूचे सेवन केले जात आहे. त्यामुळे पदपथांवरील मद्यपींच्या घोळक्यांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
नवी मुंबईत उघड्यावर होत असलेल्या मद्यपानाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी उघड्यावर मद्यपान केले जाते. रेल्वे स्थानक, फुटपाथ आवारात आणि स्थानकाच्या बाहेरील असलेल्या फुटपाथवर खुलेआम मद्यपान केले जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. कोपरखैरणे विभागातही उघड्यावर काही मद्यपी घोळक्याने उभे राहत आहेत. त्यामुळे नागरिकांची रेलचेल असलेल्या परिसरात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
--------------------------------------------
कोपरखैरणेतील पदपथावर मद्यपान करणाऱ्यांवर वारंवार पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, पुन्हा तीच स्थिती निर्माण होत असल्याने कठोर कारवाई करण्यात येईल.
-अजय भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे
---------------------------------
कोपरखैरणे येथील पदपथांवर अनेक ठिकाणी मद्यपी उभे असतात. त्यामुळे महिलांना आणि वयोवृद्धांना प्रवास करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-मनीषा मोरे, रहिवासी, कोपरखैरणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com