जव्हारमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जव्हारमध्ये कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हारसारख्या आदिवासीबहुल भागात शासकीय उपाययोजनातून विकासाला सुरुवात झाली आहे. या तालुक्यात आधीच रिक्त पदे, प्रभारी पदाचा कार्यभार या सगळ्या गोष्टींमुळे कामे होताना असंख्य अडचणी येत आहेत. त्यात तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू व्हावी, याकरिता बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे नागरिकांना कामे होताना काहीही चूक नसताना गैरसोयीचा सामना करावा लागला.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपाचे हत्यार उपसल्यानंतर जव्हार तालुक्यातही हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले होते. भरउन्हात मोर्चा काढून शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली ताकत दाखवली. कर्मचाऱ्यांनी उपसलेल्या संपाच्या हत्यारामुळे सर्वच शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. जव्हार पंचायत समिती आवारात तालुक्यातील शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चासाठी एकत्र जमले होते. विविध घोषणांचे फलक हाती घेत हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी झाले. पंचायत समितीपासून सुरुवात होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला वंदन करून भरउन्हात मोर्चा काढण्यात आला.

------------------
महत्त्वाच्या कामात अडथळा
तालुक्यातील शेकडो नागरिक आपापली कामे करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती वनविभाग, महाविद्यालय या ठिकाणी आल्यानंतर संप असल्याचे लक्षात येताच नागरिकांचा हिरमोड झाला. शिवाय परीक्षा सुरू असताना महत्त्वाची कागदपत्रे जमवताना संपामुळे अडचणी उद्भवल्या.
- सरिता चौधरी, पालक, जव्हार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com