फ्लेक्सबाजीमुळे विद्रुपीकरण

फ्लेक्सबाजीमुळे विद्रुपीकरण

नवीन पनवेल, ता.१५ (वार्ताहर)ः पनवेल शहर व परिसरातील रस्त्यांवर सध्या सण, उत्सव, धार्मिक, वैयक्तिक कार्यक्रमापासून ते ऋणनिर्देशासारख्या विविध प्रकाराची फ्लेक्सबाजी केली जात आहे. या प्रकारामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील पालिकेच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जात असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू असल्याची नाराजी सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
पनवेल शहराच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा फ्लेक्स लावल्याचे चित्र आहे. फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या प्रकारावर ‘सकाळ’ने वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. तसेच पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देखील वेळोवेळी याप्रकारावर कारवाई केली जात आहे. अशातच सध्या पनवेल पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील मुख्य मार्गातील प्रमुख भागांमध्ये स्वच्छतेविषयक संदेश देणारी विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. यामुळे एकीकडे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. पण दुसरीकडे बेकायदा फलक झळकत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे.
------------------------------------------------
पालिका क्षेत्रात बेकायदा फ्लेक्स बॅनर लावू नयेत म्हणून वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यापुढे शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- सदाशिव कवठे, प्रभाग अधिकारी, पनवेल महापालिका
-------------------------------------
शहरातील प्रत्येक रस्ते, चौकांवर फ्लेक्स दिसतात. बेकायदा जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू झाले आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. आपल्या शहरातील प्रत्येक रस्ता, चौकाला मोकळा श्वास घेता आला पाहिजे.
-यतीन पाटील, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com