घरफोडीतील दोन सराईत जेरबंद

घरफोडीतील दोन सराईत जेरबंद

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : तळोजा भागातील नितळस गावामध्ये घरफोडी करून ७ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अटक केली आहे. सुमीत शेळके (२४) व श्रीनाथ वाघमारे (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तळोजा भागातील नितळस गावातील रामदास पाटील यांच्या घरी १ मार्च रोजी चोरी झाली होती. या वेळी रामदास पाटील व त्यांचे कुटुंबीय टेरेसवर झोपले असताना सुमीत शेळके याने खिडकीवाटे त्यांच्या घरात प्रवेश त्यांच्या घरातून ४ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईल असा एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत तळोजा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास सुरु केला होता. त्यानुसार पोलिसांनी मुंबईतील कुर्ला आणि वडाळा भागात राहणारे सराईत चोर सुमित शेळके व श्रीनाथ वाघमारे यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी वेगवेगळ्या भागात रेकी करून घरफोडी करत होते.
----------------------------------
घरफोडीचे ८ गुन्हे दाखल
युनिट-३ च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसी टीव्ही फुटेज मिळवून त्याची पडताळणी केली. त्याचप्रमाणे तांत्रिक तपासाद्वारे मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या परिसरात आरोपींचा शोध घेतला. अखेर गुन्हे शाखने कुर्ला बैल बाजार येथून सुमित शेळकेला; तर श्रीनाथ वाघमारे याला वडाळा भागातून ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या सुमित शेळकेवर नागोठणे, सातपाटी, केलवा, अलिबाग, दिघी या पोलिस ठाण्यात घरफोडीचे ८ गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com