शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप
शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप

शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटप

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) : गणेशपुरी (ता. भिवंडी) येथील गुरुदेव सिद्ध पीठप्रेरित प्रसाद चिकित्सा संस्थेच्या वतीने तानसा खोऱ्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणेवाटपाचा कार्यक्रम सोमवारी (ता. १३) पार पडला. या वेळी प्रसाद चिकित्सा संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील एक हजार २०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परिसरातील बहुतांश मुले हे अनवाणी पायाने शाळेत येत असतात. ही बाब प्रसाद चिकित्सा संस्थेला लक्षात येताच सोमवारी विद्यार्थ्यांना पादत्राणेवाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शाळेतील १७१ मुलांना पादत्राणेवाटप करण्यात आले.