पार्किंगचा जाब विचारल्याने तलवारीने हल्ला

पार्किंगचा जाब विचारल्याने तलवारीने हल्ला

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : चहाच्या टपरीसमोर ट्रेलर पार्क केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने ट्रेलरचालकाने टपरीचालकावर तलावारीने वार केल्याची घटना पळस्पे येथील कातकरी वाडीत घडली. रामआशीष सरोज (५२) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (३०) याला ताब्यात घेतले आहे. रामआशीष यांची पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील मामाच्या धाब्याजवळ चहाची टपरी आहे. पहाटे ३ च्या सुमारास राहुलने रामआशिष यांच्या टपरीसमोर ट्रेलर उभा केला. या वेळी तेथील सुरक्षारक्षकाने राहुलला ट्रेलर तेथून काढण्यास सांगितले होते. त्याने याकडे दुर्लक्ष केले. ही बाब सुरक्षा रक्षकाने घराच्या बाहेर झोपलेल्या रामआशीषला सांगितल्यानंतर त्याने राहुलला विचारणा केली. याचा राग आल्याने राहुलने गाडीमधून तलवर काढून रामआशीष यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com