डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : उरण येथून बेलापूरच्या दिशेने येणाऱ्या स्कुटी चालकाला भरधाव डम्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी चालकाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी गव्हाणफाटा-बेलापूर मार्गावर ही घटना घडली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी डम्पर चाकलाला ताब्यात घेतले आहे.
भांडुप पूर्व येथील सीजीएस कॉलनीत राहणारा भावेश ठाकूर (३०) मंगळवारी सकाळी कामानिमित्त उरण परिसरात आला होता. त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास आपल्या स्कुटीवरून बेलापूरच्या दिशेने जात होता. पावणे अकराच्या सुमारास भावेश गव्हाणफाटा ते बेलापूर रोडवरील उड्डाण पुलावर आला असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डम्परने त्याला धडक दिली. यात भावेश स्कुटीसह खाली पडल्याने डम्परच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता.