गगनगिरी महाराज आश्रमाला रिक्षाचालकांची देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनगिरी महाराज आश्रमाला रिक्षाचालकांची देणगी
गगनगिरी महाराज आश्रमाला रिक्षाचालकांची देणगी

गगनगिरी महाराज आश्रमाला रिक्षाचालकांची देणगी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः घाटकोपरमधील जय गगनगिरी रिक्षा चालक मंडळाने खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रमाला आपली देणगी सुपूर्द केली. जय गगनगिरीमधील रिक्षा चालक नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गोरगरीब जनतेची सेवा, रुग्ण सेवा, रक्तदान, प्रशासकीय मदत अशा प्रकारची कामे ते नेहमीच करताना दिसतात. दरवर्षी साध्या पद्धतीने पूजा घालून अनावश्यक खर्च टाळून ते कार्य करत असतात. या वर्षी बचतीच्या पैशांतून खोपोली येथील गगनगिरी आश्रमात येणाऱ्या भाविकांच्या सुखसोईसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये त्यांनी दिले आहेत.

सापाला पकडण्यात यश
चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः चुनाभट्टी येथील गुलमोहर मार्ग परिसरातील विश्वकर्म सोसायटी परिसरातून सापाला पकडण्यात यश आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथील कामगाराला साप दिसला. त्‍याने याबाबत स्थानिक प्रतिनिधी व समाजसेवक जितेंद्र जाधव यांना सांगितले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र सिद्धार्थ गायकवाड, राहुल जाधव यांना संपर्क केला असता त्‍यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडून ठाण्यातील जंगलात जाऊन सोडले.