Mon, March 27, 2023

विंधणेत सिडकोची तोडक कारवाई
विंधणेत सिडकोची तोडक कारवाई
Published on : 15 March 2023, 11:38 am
उरण, ता.१५ (वार्ताहर)ः विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायिकाच्या बेकायदा बांधकामावर सिडको नैना विभागाच्या अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई केली आहे. त्यामुळे नैना क्षेत्रात नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विंधणे ग्रामपंचायत हद्दीत किसन राठोड नामक व्यावसायिकाची ही इमारती होती. विकासकाने या बांधकामासाठी सिडकोच्या नैना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच इमारत बांधताना नियमांचा भंग केला होता. त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार सिडको आणि तहसीलदारांकडे नोंदवण्यात आली होती. या तक्रारींच्या आधारावर सिडकोने कडेकोट पोलिस बंदोबस्तात कारवाई केली आहे.