विरारमध्ये रिअल इस्टेट एजंट्ससाठी मोफत सेमिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये रिअल इस्टेट एजंट्ससाठी मोफत सेमिनार
विरारमध्ये रिअल इस्टेट एजंट्ससाठी मोफत सेमिनार

विरारमध्ये रिअल इस्टेट एजंट्ससाठी मोफत सेमिनार

sakal_logo
By

वसई, ता. १५ (बातमीदार) : महरेरा करून रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार एसआयआयएलसीच्या माध्यमातून विरार पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या भाऊसाहेब वर्तक सभागृह या ठिकाणी इस्टेट कन्सल्टंट विकास मंडळाद्वारे सेमिनारचे आयोजन शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
या वेळी इस्टेट कन्सल्टंट विकास मंडळाचे अध्यक्ष लायन डॉ. प्रशांत पाटील, ॲड. दिनेश आदमणे, आयआरईएफचे संचालक अभय कुमार उपस्थित राहणार आहेत. घर, जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीबाबत ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला महरेरा प्रमाणपत्र प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रिअल इस्टेट एजंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास दृढ होऊन व्यवसायाला कायदेशीर व्यासपीठावर आणण्यासाठी एसआयआयएलसीच्या माध्यमातून मोफत सेमिनार आयोजित केला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एजंट्सना याचा फायदा होणार असून या वेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
----------------------
सेमिनारविषयी
ठिकाण - भाऊसाहेब वर्तक सभागृह, विरार पश्चिम
केव्हा - १७ मार्च २०२३
वेळ - सकाळी ११ ते २