मुंबईत एच३एन२च्या ११ रुग्णांची नोंद

मुंबईत एच३एन२च्या ११ रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना नव्याने पसरणाऱ्या इन्फ्‍यूएन्झाने (एच३एन२) सर्वांची झोप उडवली आहे. झपाट्याने पसरणाऱ्या इन्फ्लूएन्झाने आता मुंबईत प्रवेश केला असून शहरात ११ रुग्ण आढळल्याने पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. इन्फ्‍यूएन्झाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात १० खाटा तैनात करण्यात आल्या असून विशेष विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.
एच३एन२ विषाणूचे देशात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ताप, खोकला, सर्दी असल्यास वेळीच तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावा, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.
इन्फ्‍यूएन्झाचे मुंबईत ११ रुग्ण आढळले असून पालिका व खासगी रुग्णालयांत बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेचे विशेष विषाणू रुग्णालय असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष उभारला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
श्वसनसंबंधी आजाराच्या रुग्णांत वाढ
केंद्रीय आकडेवारीनुसार जानेवारीत देशभरात श्वसनाचे आजार आणि इन्फ्ल्यूएन्झाचे ३ लाख ९७ हजार रुग्ण नोंदवले गेले होते. हा आकडा फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३६ हजारांवर पोहोचला आहे. मार्चच्या पहिल्या केवळ नऊ दिवसांत या आजारांच्या रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार झाली.
...
अशी घ्या काळजी!
संसर्गजन्य आजारांत तोंडावाटे किंवा नाकातून बाहेर पडणाऱ्‍या स्रावातून आजार पसरत असल्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुळे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सर्दी, खोकला आणि तापासारखी लक्षणे असल्यास इतरांपासून दूर राहणे, अशी काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे निर्देशही केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com