मुंबईतील शिक्षकांना पालघरमध्ये बांबू हस्तकलेचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील शिक्षकांना पालघरमध्ये बांबू हस्तकलेचे धडे
मुंबईतील शिक्षकांना पालघरमध्ये बांबू हस्तकलेचे धडे

मुंबईतील शिक्षकांना पालघरमध्ये बांबू हस्तकलेचे धडे

sakal_logo
By

विरार, ता. १५ (बातमीदार) : मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत कार्यानुभवाच्या शिक्षकांसाठी सेवा विवेक सामाजिक संस्थेच्या प्रकल्पावर एक दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बांबू हस्तकला कारागीर आदिवासी महिलांनी पालिकेच्या १०० शिक्षकांना बांबू हस्तकलेपासून विविध गोष्टी बनवून दाखवत बांबू हस्तकलेचे बारीक पैलू शिकवले. अभ्यास वर्गात पालिकेचे मुख्य शिक्षण अधिकारी राजेश कानल आणि शिक्षण अधिकारी सुजाता खरे उपस्थित होते. सेवा विवेक सामाजिक संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी पालघरमधील आदिवासी गरुजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा, त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.