Thur, June 1, 2023

मुंबई-गोरखपूर दरम्यान एसी विशेष ट्रेन!
मुंबई-गोरखपूर दरम्यान एसी विशेष ट्रेन!
Published on : 15 March 2023, 4:33 am
मुंबई, ता. १५ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरदरम्यान एसी स्पेशल रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक ०५०६० मुंबई-गोरखपूर वातानुकूलित स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १९ मार्च २०२३ रोजी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०५०५९ एसी स्पेशल गोरखपूर येथून १७ मार्च २०२३ रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.