कासात सेवानिवृत्त एकात्मता दिन कार्यक्रम

कासात सेवानिवृत्त एकात्मता दिन कार्यक्रम

कासा, ता. १६ (बातमीदार) : सेवानिवृत्त संघटना कासा विभाग यांचा सर्व निवृत्त सभासद व कुटुंबीयांचा १९ वा एकात्मता दिन (मेळावा) बुधवारी (ता. १५) शिवमंदिर सभागृह कासा येथे साजरा करण्यता आला. या वेळी डहाणू सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, जिल्हा कोषागार अधिकारी सुजित देवकर, कासा पोलिस अधिकारी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या मेळाव्यात सेवानिवृत्त सदस्यांच्या अडीअडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, वेळेवर निवृत्तिवेतन न मिळणे, वेतनाचा योग्य वापर या बाबतीत अनेकांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सभासदांचा तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय सेवानिवृत्त कर्मचारी पुरस्कार प्राप्त हेमंत धानमेर व एन. माच्छी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ सभासदांनी आपले अनुभव कथन केले. संघटनेमुळे कसा फायदा झाला हे सांगितले. कासा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष हेमंत धानमेर यांनी केलेल्या धडाडीच्या कामामुळे अनेक सदस्यांनी त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला संदीप नागरे, मारुती वाघमारे, कमलाकर केणी, श्रावण गावित, शैलेश घारपुरे, महेन्द्र पवार, धनंजय वनमाळी, विविध प्रभागाचे सेवानिवृत्त अधिकारी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा वर्तक यांनी केले. या कार्यक्रमासाठी शैलेश घारपुरे यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com