उपराळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

उपराळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील उपराळे जिल्हा परिषद शाळेत जनाबाई पांडुरंग जाधव व गणपत मंगल्या वसईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. सामाजिक कार्यकर्ते आनंद पांडुरंग जाधव यांच्या पुढाकाराने आणि सोल्डेस्ट फाऊंडेशनच्या व दुमीबाई सालू वाझ धर्मादाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या वेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. सोल्डेस्ट फाऊंडेशनचे चेअरमन शेन कुटिन्हो, विश्वस्त अँथोनी डीकुन्हा, विजय माने, डॉ. मोईद खान तसेच डॉ. रोहित पापलकर, डॉ. सुप्रिया पापलकर, उपराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योत्स्ना मोहोंडकर, चिंतामण मोहोंडकर, मातेरा गुरुजी, उपस्थित होते. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी चिंतामण मोहोंडकर, अरुण शेलका, सदाभाऊ आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com