
कल्याण पश्चिम मध्ये विकासकामाचा धडका
कल्याण, ता. १६ (बातमीदार) ः कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार विकास निधीतून संघवी इस्टेट सोसायटीमध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कल्याण पश्चिममधील संघवी ईस्टेट सोसायटीच्या आवारात रहिवाशांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या वेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख (पश्चिम) रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, उपशहरप्रमुख अंकुश जोगदंड, विभाग संघटक शिरिन पठाण, उपविभाग प्रमुख दीपक धनावडे, अजय हिरवे, उपशाखा संघटक वंदना जळवी, मनाली जाधव, नयना वाघमारे, शाखा प्रमुख चेतन म्हामूणकर उपशाखा प्रमुख प्रतापराव चव्हाण, प्रमोद म्हात्रे, दिलिप सातारकर, गटप्रमुख नयन गायकवाड, सोसायटीचे पदाधिकारी अरूण पाटील, भगवान पाटील, विठोबा गावडे, युवासेना कल्याण जिल्हा सचिव योगेश पाटील, मोहने-टिटवाळा शहर प्रमुख दिनेश निकम, युवासैनिक अजिंक्य घोलप, प्रथमेश पाटील, गजानन पाटील, साहिल चौथे उपस्थित होते.