Tue, June 6, 2023

नितीन माळी यांना वैद्यकीय विषयात पीएचडी
नितीन माळी यांना वैद्यकीय विषयात पीएचडी
Published on : 16 March 2023, 11:18 am
मनोर, ता. १६ (बातमीदार) : नितीन माळी यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जाणारी अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) विषयात त्यांनी संशोधनात्मक प्रबंध सादर केला. मुंबईतील प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल (केईएम) आणि सेठ गोरधंदास सुंदेरदास मेडिकल कॉलेजमधील क्लिनिकल फार्माकॉलॉजी विभागात त्यांनी संशोधन केले. माळी यांचे पदव्युत्तर शिक्षणही संशोधनाद्वारे केईएम रुग्णालयातून झाले आहे. आतापर्यंत त्यांचे नऊ संशोधनपर प्रबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.