वसई महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ
वसई महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ

वसई महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ

sakal_logo
By

विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई विकासिनी दृक् कला महाविद्यालयाचे वार्षिक चित्रकला प्रदर्शन वसई विकासिनी भवन वसई रोड पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‍घाटन वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ३७ व्या वार्षिक कला प्रदर्शन उद्‍घाटन व सत्कार समारंभ कार्यक्रमास सत्कारमूर्ती शिल्पकार सचिन चौधरी, चित्रकार प्रताप मोरे, वसई विकासिनीचे अध्यक्ष नारायण मानकर, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, उपकार्याध्यक्ष संदेश जाधव, सरचिटणीस विश्वस्त विजय वर्तक, संयुक्त चिटणीस विश्वस्त जयंत देसले, विश्वस्त सचिव भरत दोशी, विश्वस्त के. ओ. देवासी, कला महाविद्यालय समितीप्रमुख विश्वस्त अजय उसनकर, कार्यकारिणी सदस्य प्रकाश वनमाळी, राजेश पाटील, कल्पक पाटील, मनीषा जाधव, फ्रँकलीन सेरेजो, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वार्षिक कला प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे कौतुक केले. तसेच वसई विकासिनीच्या उपक्रमास भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. विद्यार्थी प्राध्यापकांच्या कलेची प्रशंसा करून. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुशोभीकरणास संस्थेच्या विद्यार्थी, शिक्षक यांनी सहभाग द्यावा, असे आवाहन केले.