कर्जतमधील सागाची वाडीत रानगव्याचे दर्शन

कर्जतमधील सागाची वाडीत रानगव्याचे दर्शन

नेरळ, ता. १६ (बातमीदार)ः कर्जत तालुक्यात जानेवारी महिन्यात रानगव्याचे दर्शन झाले होते. त्या वेळी आलेल्या रानगव्याने वनविभागाला चार दिवस पळविले होते. आता पुन्हा माथेरान डोंगर परिसरात रानगवा दिसला आहे. आदिवासी भागात रानगवा दिसल्याने ग्रामस्‍थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा येथील महाबळेश्वरमध्ये अधिवास असलेला रानगवा २९ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यात आढळला होता. भिसेगाव खिंडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रानगवा रात्री दिसला होता. सकाळी माणगावतर्फे वरेडी या गावातील लोकांना रानगव्याचे दर्शन झाले. रानगव्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी गव्याच्या चार दिवस शोध घेतला होता. त्यानंतर त्‍याला भीमाशंकर जंगलात पळवण्यात आले. बुधवारी पुन्हा माथेरानजवळच्या सागाची वाडीत रानगवा दिसून आला. याबाबत ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला कळवले. माथेरान वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांना गव्याबाबत माहिती देत सतर्कतेच्या सूचना केल्‍या. दरम्यान गवा पाण्याच्या शोधात फिरत असल्याने त्याला कुणीही त्रास देऊ नये, तसेच फोटो काढण्यासाठी जवळ जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

सागाची वाडी भागात रानगवा दिसल्याचे ग्रामस्थांनी कळवले होते. त्यानुसार तत्काळ त्या भागात पोहचलो. मात्र गवा दिसला नाही. या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असल्‍याने पाण्याच्या शोधात तो फिरत असावा, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवला आहे. नागरिकांनी गव्याला त्रास देऊ नये, त्‍याला पळवण्यासाठी दगड, काठी मारू नये.
- सुहास म्हात्रे, वनपाल, माथेरान वनपरिक्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com