कासा चारोटी परीसरात रिक्षांमुळे वाहतूक कोंडीत भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा चारोटी परीसरात रिक्षांमुळे वाहतूक कोंडीत भर
कासा चारोटी परीसरात रिक्षांमुळे वाहतूक कोंडीत भर

कासा चारोटी परीसरात रिक्षांमुळे वाहतूक कोंडीत भर

sakal_logo
By

कासामध्‍ये स्वतंत्र रिक्षा स्टँडची गरज
महेंद्र पवार, कासा
कासा चारोटी परिसरात सद्या अंदाजे १८५ अनधिकृत रिक्षा आहेत. तर ५० ते ५५ अधिकृत रिक्षा आहेत. सायवन, सूर्यानगर, धुंदलवाडी, तवा, उर्से, मुरबाड या गाव-खेड्यात रिक्षांव्यतिरिक्त अन्‍य प्रवासी वाहने देखील आहेत. याठिकाणी अधिकृत रिक्षातळाची मागणी देखील करण्यात येत आहे. अनेक गावखेड्यात बस सेवा नसल्याने रिक्षा, इको प्रवासी वाहन हेच साधन असते. विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण यांना त्‍याचाच आधार घ्‍यावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असतात. खेडोपाड्यात तर रिक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जातात. त्यात गाव-खेड्यातील रस्ते खराब असल्याने धोकादायक प्रवास करत येथील नागरिक जगत आहेत. कासा ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असते. डहाणू-नाशिक राज्य मार्गावरच कासा, चारोटी ही गावे आहेत. लांब पल्ल्याच्या बस स्टॉपवर अनेक ठिकाणी रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे नेहमी गर्दी होऊन वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी स्वतंत्र रिक्षा स्टँडची व्यवस्था करावी, अशी देखील मागणी होत आहे.
----------------------------------------------
डहाणूत रिक्षा कोंडीचा ताप
डहाणू पोलिस हद्दीत डहाणू रेल्वे स्टेशनवरून फोर्ट, आशागड, कंक्रांती यासह अनेक भागात सुटणाऱ्या जवळपास २५० ते २६० अधिकृत रिक्षा आहेत, तर ४० ते ४५ पेक्षा अधिक अनधिकृत आहेत. डहाणू रेल्वे स्टेशन परिसरात अनेक रिक्षा या मुख्य रस्त्याच्या मधोमध उभ्या असल्याने त्याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या समांतर दोन्ही बाजूस इतर रिक्षा उभ्‍या असल्याने नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर अनेक भाजी विक्रेते हातगाडी वाले देखील याच मार्गावर बसलेले असतात त्यात सकाळ व संध्याकाळ शाळकरी मुले खरेदी करणारे रुग्ण यामुळे नेहमीच त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते यासाठी प्रशासनाने या भागात उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
--------------------------------------------------
कोट
डहाणू रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना प्रवासी रिक्षा पकडण्यासाठी जात असतात. त्‍यांना अनेक वेळा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अनेक मोठ्या वाहनांनी हा रस्ता नेहमीच फुललेला असतो. त्यात अदानी कंपनीकडे जाणारी अनेक वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने रिक्षा स्टॅन्डसाठी काही व्यवस्था करावी जेणेकरून वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही.
-सुरेश चव्हाण, प्रवासी
----------------------
कासा रस्त्यावर सकाळ व संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होत असते. अनेक प्रवासी वाहने रिक्षा बस स्टॉप जवळ उभ्या करीत असल्यामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागतो प्रशासनाने योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिसला द्यावा.
-संजय पाटील, प्रवासी.
-------------------------------------------