
जकातचोरी वाहनांवर कारवाई
कासा, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दापचरी येथे सीमा तपासणी नाका असून अनेक ओव्हरलोड वाहने जकात चुकवण्यासाठी आड मार्गाचा वापर करीत असतात. गुरुवारी पहाटे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान दापचरी येथील आड मार्गाने जाणारी अवघड वाहने जात असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी या अवजड वाहनांवर कारवाई करत ७६ हजाराचा दंड ठोठावला आहे.
दापचरी जकात नाक्यावरून गुजरात व मुंबईकडे जाणारी अनेक वाहने तलासरीजवळ आडमार्गाने दापचरीपर्यंत येतात. यात अनेक जकात चोरांचे त्यांना सहकार्य मिळते. ही वाहने आडमार्गाने नेत असताना यात अनेक स्थानिक टोळ्या सक्रिय आहेत. ही वाहने आडमार्गाने बाहेर येजा करीत असताना दापचारी येथील रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे २५ ते ३० ग्रामस्थांनी मध्यरात्री पाळत ठेवून या अवजड वाहनांना रोखले. त्यानंतर आरटीओशी संपर्क साधत कारवाई करण्यात आली. त्यामुळे अवजड वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
--------------------
ओहरलोड वाहने आड रस्त्याने नेत असताना अपघाताचा धोका आहे. महसूल चुकवण्यासाठी कोणताही वाचनचालक सापडल्यास कारवाई केली जाईल. नागरिकांनीदेखील अशी आड रस्त्याने वाहतूक केली जात असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
- संकेत चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक