‘स्वच्छ नवी मुंबई’चे श्रेय कचरावेचकांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वच्छ नवी मुंबई’चे श्रेय कचरावेचकांना
‘स्वच्छ नवी मुंबई’चे श्रेय कचरावेचकांना

‘स्वच्छ नवी मुंबई’चे श्रेय कचरावेचकांना

sakal_logo
By

खारघर, ता. १६ (बातमीदार) : ज्या ठिकाणी कचरा गाडी जाण्याची यंत्रणा नाही तिथे जाऊन कचरावेचक महिला प्रामाणिकपणे काम करतात. नवी मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचकांचे असल्याचे, मत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.
कोपरखैरणे येथे स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे कचरावेचक भगिनी संवाद सभा घेण्यात आली होती. या सभेत बोलताना आयुक्तांनी सध्या ज्या पाच ठिकाणी ‘स्लम मॉडेल’ म्हणून सुरू असलेले काम वाढ अजून चार ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करून दोन ठिकाणी ट्रान्स्फर सेंटर उभारण्याचा मानस आहे. सेंटर उभारल्यास महिलांना सुका कचरा चांगला मिळेल त्यातूनच नवी मुंबई स्वच्छ व कचरा मुक्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. शिवाय नवी मुंबई स्वच्छ करणे एवढे मर्यादित हेतू नसून यातून या महिलांच्या सबलीकरणालादेखील मदत होईल. या वेळी संघटनेच्या सदस्या वृषाली मगदूम यांनी कचरावेचक महिलांना महापालिका प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
-------------------------------
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कचरावेचकांना मिळणाऱ्या सुविधांच्या धरतीवर नवी मुंबई महापालिकेकडून कचरा वेचक महिलांसाठी विविध उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. तसेच कचरावेचक महिलांची पुढील पिढी या कामात येऊ नयेत, या उद्देशाने त्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी योगदान प्रयत्न केले जात आहेत.
- ज्योती मापसेकर, अध्यक्ष, स्त्री मुक्ती संघटना