अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभा पुढे ढकलली

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभा पुढे ढकलली

पालघर, ता. १६ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (ता. १६) तिसऱ्या दिवशीही संपावर गेले आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पालघर तालुका पंचायत समिती कार्यालयाजवळ गुरुवारी दुपारी या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी निदर्शने केली. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, असा ठाम निर्णय या निदर्शनात घेण्यात आला. पालघर तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळे कार्यालये ओस पडली आहे. आर्थिक वर्षाचा मार्चअखेरचा महिना असल्याने कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्हा परिषदेची महत्त्वाची सभासुद्धा रद्द करावी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सभा ही पुढे ढकलावी लागली आहे.
मार्चअखेर विकासनिधी संपविण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत; तर अनेक भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर ताण पडला असून बहुसंख्य कर्मचारी वैद्यकीय परिचारिकासह संपात सहभागी झाल्याने रुग्णसेवा कोलमडून पडली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी (ता. १७) आयोजित करण्यात आली होती; मात्र कर्मचारी संपामध्ये असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. १५) सकाळी तातडीने बैठक घेऊन सभा पुढे ढकलली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com