खर्डीतील मनसे पदाधिकारी भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डीतील मनसे पदाधिकारी भाजपमध्ये
खर्डीतील मनसे पदाधिकारी भाजपमध्ये

खर्डीतील मनसे पदाधिकारी भाजपमध्ये

sakal_logo
By

खर्डी, ता.१६ (बातमीदार) : खर्डीतील मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. या वेळी भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील यांची उपस्थिती होती.
मनसेचे तालुका उपप्रमुख जयवंत बोडके, तालुका सहसचिव मच्छिंद्र गोजरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष स्वप्निल पिचड, अनिस शेख, सन्नी दुनगेया, सुरेश सामरे, सदा शिंदे, नाना जागले, कार्तिक भाकरे यांच्यासह शिरोळ, बिरवाडी परिसरातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी खर्डी भाजपचे शहराध्यक्ष अश्फाक अत्तार, अशोक इरणक, दशरथ तिवरे, भास्कर जाधव हे उपस्थित होते. या प्रवेशामुळे भाजपची खर्डीतील ताकद वाढली असल्याचे अत्तार यांनी सांगितले.