‘नैना’विरोधी आंदोलनाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नैना’विरोधी आंदोलनाची सांगता
‘नैना’विरोधी आंदोलनाची सांगता

‘नैना’विरोधी आंदोलनाची सांगता

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १६ (वार्ताहर)ः पनवेल तालुक्यातून नैना प्राधिकरणाला विरोध केला जात आहे. या आंदोलनाची सांगता पाले बुद्रुक येथील गावबंद आंदोलनातून करण्यात आली. या वेळी आम्हाला नैना नको, असा निर्धार पाले ग्रामस्थांनी केला.
नैनाविरोधात गाव बंद आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने आता निर्णायक लढा देण्याचा निर्धार प्रकल्पबाधितांनी केला आहे. याच अनुषंगाने नैना प्राधिकरणाच्या विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गावागावात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. या वेळी नैना प्रकल्पासंदर्भात जी. आर. पाटील यांनी नैनामुळे होणाऱ्या नुकसानाचे तोटे ग्रामस्थांना सांगितले. तसेच या जनजागृती कार्यक्रमात १९८४ च्या लढ्यापासून आजपर्यंतचा इतिहासदेखील मांडण्यात आला; तर नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे सचिव राजेश केणी यांनी नैनाविरोधात लढाई जिंकण्यासाठी विधिमंडळ, न्यायालयीन लढाई तसेच आंदोलनातून निर्णायक लढा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
---------------------------
४० गावांमधील व्यवहार बंद
नैनाविरोधी हाकेला शेतकऱ्यांसोबत गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नैना हटाव, अभी नही तो कभी नही! अशी भूमिका या वेळी संतप्त गावकऱ्यांनी मांडली आहे. तसेच जवळपास ४० गावांमधील अंतर्गत व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.