खर्डीत आरोग्य शिबीर

खर्डीत आरोग्य शिबीर

खर्डी, ता.१६ (बातमीदार) : जिजाऊ संघटनेच्या खर्डी शाखा आणि धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. खर्डी विभागातील १०९ नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या शिबिरात जनरल तपासणी, स्त्रीरोग व अस्थिरोग तपासणी या आजारांवर तपासणी करण्यात आली. या वेळी आदिवासी सेवक दिलीप अधिकारी, दळखणचे माजी सरपंच विनायक आपटे, बंडू खर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरासाठी एसएमबीटीचे रफिक शेख, जिजाऊ संघटनेचे किशोर घरत, गितेश भोईर, समाधान सांडे, गणेश भांगरे, दीपक तुपांगे, नंदकुमार घरत, सुभाष करवर, हरेश मोगरे व आदित्य उगले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com