
मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करा
ठाणे, ता. १६ : इतिहासातील एक मातब्बर मराठा सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती शासनस्तरावर साजरी झाली पाहिजे, अशी मागणी धनगर प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतिष्ठाणच्या वतीने गुरुवारी (ता.१६) होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ही मागणी करण्यात आली आहे.
ठाण्यातील जांभळी नाका येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुभेदार मल्हरराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले.अशा या महापराक्रमी योध्याची जयंती शासन स्तरावर साजरी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. या वेळी राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे विभागातील वाहतूक निरीक्षक पुंडलिक गोरे, जेष्ठ नेते बाबासाहेब दगडे, उज्वला गलांडे, वर्षा माने, संदीप माने, संस्थेचे सल्लागार प्रसाद वारे, मनोहर वीरकर, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला अध्यक्ष माधवी बारगीर, सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष कुमार पळसे, कार्यकारणी सदस्य दीपक झाडे, सुरेश भांड, रमेश गलांडे, अमोल माने, सुनील पळसे, हणमंत ढेरे, रमेश बंडगर, सुजाता भांड, स्मिता गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.