
बकरा विक्रेत्याची फसवणूक करणाऱ्याला अटक
बकरा विक्रेत्याची
फसवणूक करणाऱ्याला अटक
मानखुर्द, ता. १६ (बातमीदार) ः गोवंडीतील बकरा मंडईतील विक्रेत्याच्या फसवणूकप्रकरणी देवनार पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) एकाला अटक केली आहे. यासिन शेख (वय ३५) असे त्याचे नाव असून त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. शेखने झाफर कुरेशी यांच्याकडून दोन बकरे खरेदी करून २० हजार रुपये ऑनलाईन पाठवल्याचा बनाव केला होता.
देवनारच्या पशुवधगृहाच्या आवारातील मंडईत झापर कुरेशी बकऱ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी सायंकाळी त्यांच्याकडून यासिनने दोन बकरे घेतले. त्या बदल्यात त्याने २० हजार रुपये झापर यांचे मित्र मोसिनच्या मोबाईलवर पाठवल्याचा बनाव केला. मात्र, पैसे खात्यात जमाच झाले नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झापर यांनी देवनार पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार तपास करून पोलिसांनी शेखला अटक केली.