टाटा कॅन्सर सेंटरमधील खाटांची संख्या तातडीने वाढवा

टाटा कॅन्सर सेंटरमधील खाटांची संख्या तातडीने वाढवा

नवी मुंबई : कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा मेमोरिअल रिसर्च ॲण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयात येतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळाची संख्या तब्बल २४०५; तर खाटांची संख्या ९३० करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com