दिवा येथील समस्या सोडवण्याची मागणी

दिवा येथील समस्या सोडवण्याची मागणी

दिवा, ता. १६ (बातमीदार) ः ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिवा शहरातील जनतेच्या समस्या सोडवून नागरिकांना न्याय द्यावा, त्यासाठी आयुक्तांनी दिवा शहर पाहणी दौरा करावा, असे आमंत्रण दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी दिले आहे.

दिवा शहरातील नागरिकांना सार्वजनिक शौचालय, पोलिस ठाण्यासाठी जागा, ग्रंथालय, वाचनालय, सहकारी हॉस्पिटल, सांस्कृतिक भवन, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, खेळाचे मैदान, गार्डन, चांगले रस्ते, फेरीवाल्यांसाठी फेरीवाला झोन, मार्केट या सर्व सुविधा नाहीत. त्यामुळे आयुक्त बांगर यांनी दिव्यात दौरा करून त्या लवकरच उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा अमोल केंद्रे यांनी प्रशासनाला पत्र देऊन केली आहे. दिवा शहरातील मुंब्रा देवी कॉलनी दिवा स्टेशन रस्ता, मुंब्रा देवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर रस्ता, ओमकार नगर, वक्रतुंड नगर रस्ता, सावरिया डेअरी- बेडेकर नगर, रविना अपार्टमेंट- बेडेकर नगर रस्ता, दिवा स्टेशन- गावदेवी मंदिर, एन. आर. नगर रस्ता, एंजल पॅराडाईज शाळा, नारायण भगत नगर रस्ता, दत्त मंदिर मागील मुंब्रा देवी कॉलनी रस्ता, वारेकर शाळा दत्त मंदिर रस्ता, जीवदानी नगर- साबे गाव रस्ता अद्याप अपूर्ण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com