हत्या प्रकरणातील आरोपीस सश्रम कारावास

हत्या प्रकरणातील आरोपीस सश्रम कारावास

ठाणे, ता. १६ (वार्ताहर) ः हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कमलेश सुकुमन बन्सल उर्फी कुमकुम असे आरोपीचे नाव आहे. ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती रचना आर. तेहरा यांनी हा निकाल दिला.

हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी सत्र न्यायालयात आले होते. ४ जुलै २०१५ रोजी कत्रीकुमार इंदूशंकर जयस्वाल याची हत्या झाली होती. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. प्लास्टिकच्या पिशवीत भरून ते नवी मुंबईतील सीबीडी स्टेशनजवळील शौचालयाच्या कचऱ्यात गाडण्यात आले होते. आरोपी बन्सल याने मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळे त्याला हत्येच्या आरोपातून मुक्त करण्यात आले, पण त्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com