महापालिकेतील ओएसडींची 
मानधन वाढवण्याची मागणी

महापालिकेतील ओएसडींची मानधन वाढवण्याची मागणी

मुंबई, ता. १६ : महापालिकेने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मागील काही वर्षांपासून विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती दिलेली आहे. विविध विभागांत सुमारे ४० ते ५० निवृत्त अधिकारी कार्यरत आहेत; मात्र ओएसडी म्हणून नेमण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ओएसडींना देण्यात येणारे मानधन शिपायांपेक्षाही कमी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेत तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांचे आव्हान पेलण्यासाठी महापालिकेने निवृत्त अधिकाऱ्यांना करारान्वये ओएसडी म्हणून नेमणूक दिली आहे; परंतु मानधनापोटी अतिशय थोडेच पैसे मिळत असल्याने अधिकारी वर्गाची नाराजी आहे. किमान निवृत्तीवेळचा पगार मिळावा, ही आमची अपेक्षा आहे; परंतु सध्या देण्यात येणारे मानधन हे आमच्या योगदानाचा, अनुभवाचा आणि पदाचा विचार करता तुटपुंजे असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वंकष धोरण ठरवून पदाच्या अर्हता आणि अनुभवानुसार मानधन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
---
दुजाभाव का?
एखाद्या खासगी सल्लागाराला नेमणूक देताना पालिकेकडून कोट्यवधी रुपये मोजण्यात येतात. या सल्लागारांकडेही आमच्यासारखे अनुभवी अधिकारीच काम करतात; मग पालिकेसाठी थेट काम करताना पालिकेकडून दुजाभाव का, असा सवालही काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com