तायक्वांडोचे पितामह विनायक गायकवाड अनंतात विलिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तायक्वांडोचे पितामह विनायक गायकवाड अनंतात विलिन
तायक्वांडोचे पितामह विनायक गायकवाड अनंतात विलिन

तायक्वांडोचे पितामह विनायक गायकवाड अनंतात विलिन

sakal_logo
By

तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष
विनायक गायकवाड अनंतात विलीन
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (मुंबई) उपाध्यक्ष तथा पितामह विनायक गायकवाड यांचे अल्पशा आजारामुळे बुधवारी (ता. १५) निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मयूर व गौरव अशी दोन मुले व सुना-नातवंडे असा परिवार आहे.
विनायक गायकवाड यांनी १९९८-९९ पासून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेवर उपाध्यक्ष व त्यानंतर दीर्घकाळ खजिनदारपदावर काम केले. २००० पासून तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईचे ते अध्यक्ष आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार ते स्वतः हाताळत असत. मुंबईत ‘ताम’चे कार्यालय त्यांच्याकडे होते. त्यांच्या कामाची दखल घेत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (लखनऊ) शिखर संघटनेनेही त्यांच्यावर दोन वेळा खजिनदारपदाची जबाबदारी सोपवली होती. संघटनेवर सध्या ते उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. मुंबईतील सोमय्या रुग्णालयात उपचारादरम्यान १५ मार्चला त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी काळा चौकी अभ्युदयनगरमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.