नेस्को कोविड सेंटरमधील भंगार साहित्यातून ७८ लाखांची कमाई

नेस्को कोविड सेंटरमधील भंगार साहित्यातून ७८ लाखांची कमाई

नेस्को कोविड सेंटरमधील
भंगार साहित्यातून
पालिकेला ७८ लाखांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईत ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यात यश आल्यानंतर ती बंद करण्यात आली होती. गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमधून गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ७८ लाख रुपये जमा होणार आहेत.

कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरू असलेल्या कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स रुग्णालयांत रुग्णांवरील उपचार आणि विलगीकरणाची सुविधा अपुरी पडू लागली. त्यामुळे त्या वेळी बीकेसी, वरळी आणि त्यानंतर गोरेगाव नेस्को परिसरात कोविड सेंटर उभारून रुग्णांना उपचारांची सुविधा देण्यात आली होती. त्यासाठी नेस्को जंबो कोविड सेंटरच्या हॉलमध्ये एक ते पाच ठिकाणी उपचारांची सोय करण्यात आली होती. सेंटरच्या उभारणीसाठी प्रामुख्याने स्टील, अॅल्युमिनियम, नोवापॅन शिट, सिमेंट वॉल पॅनल्स इत्यादींचा वापर करण्यात आला आहे, परंतु आता कोविडची लाट ओसरल्याने सेंटर बंद करण्यात आले आहे. सेंटरसाठीच्या मंडपाचे साहित्य काढण्यात आले आहे. सद्यःस्थितीत पुन्हा सेंटर उभारण्याची शक्यता नसल्याने आणि साहित्य अजून गंज लागून खराब होण्यापूर्वीच त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सर्व साहित्यासाठी महापालिकेने सुमारे ८३ लाख रुपयांचा महसूल अपेक्षित धरला होता; परंतु प्रत्यक्षात निविदा मागवल्यानंतर त्यासाठी गॅस ट्रेडिंग कंपनीने कमी बोली लावून ७८ लाख रुपयांमध्ये भंगार सामान मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com