घोडबंदर रोडचे नाव वीर चिमाजी आप्पा मार्ग करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडबंदर रोडचे नाव वीर चिमाजी आप्पा मार्ग करा
घोडबंदर रोडचे नाव वीर चिमाजी आप्पा मार्ग करा

घोडबंदर रोडचे नाव वीर चिमाजी आप्पा मार्ग करा

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ : ठाण्यातील घोडबंदर रोड हे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ असे करण्यात यावे, अशी मागणी अभिनेता मुकेश खन्ना यांनी संग्राम फाउंडेशनच्या वतीने बुधवारी (ता.१६) ठाणे महापालिकेकडे केली केली. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.

सांस्कृतिक वासरा लाभलेल्या ठाणे शहराला अनेक वर्षांचा पुरातन काळाचा इतिहास लाभला आहे. याच ठाणे शहरात इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या तसेच पोर्तुगीजांच्या अनेक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. तर काहींचे अवशेष आजही पाहायला मिळतात. पेशव्यांचे भाऊ वीर चिमाजी अप्पा यांनी देखील सतराशेच्या काळात अनेक लढाया जिंकून ठाण्यातील अनेक गड किल्ले पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवून घेतले होते. त्यांचा पराक्रम सर्व काळातील लोकांना लक्षात राहावा, या उद्देशाने ठाण्यातील घोडबंदर रोड हे नाव बदलून ‘वीर चिमाजी अप्पा मार्ग’ असे करण्यात यावे अशी मागणी मुकेश खन्ना यांनी केली आहे. यासाठी संग्राम फाऊंडेशनच्या वतीने ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले.