Sun, June 4, 2023

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
Published on : 17 March 2023, 11:35 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चारचाकी चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली भरधाव कार क्रमांक एमएच.०४ जेएम ५३४९ने समोरील ट्रक क्रमांक आरजे.०९ जीबी.३६३८ला मागून जोरदार धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यातील चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा या अपघातात मदतकार्य करत होती. महामार्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली यातील वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.