ठाणे पालिका मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राकेश बारोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिका मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राकेश बारोट
ठाणे पालिका मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राकेश बारोट

ठाणे पालिका मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राकेश बारोट

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या दुरवस्थाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी मुख्य आरोग्य अधिकारी, तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ठाणे पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारीपदी डॉ. राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी काढला आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या वेळी रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहाची दुरवस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उपअधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती.