मुरबाड शहरात चोरटे पुन्हा सक्रीय

मुरबाड शहरात चोरटे पुन्हा सक्रीय

सरळगाव, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड शहरातील तोंडलीकरनगरात भरदुपारी चोरी झाल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुरबाड शहरात घरफोड्या व चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (ता. १७) दुपारी अडीजच्या सुमारास तोंडलीकरनगर येथील साईकृपा बिल्डिंगमध्ये दोन फ्लॕटचे दरवाजे तोडून महेश बेंडले यांच्या घरातील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सात ते आठ तोळे दागिने व काही रोख रक्क्म चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. तसेच चोरट्यांनी सत्येंद्र गुप्ता याच्या घरातील दागिने लंपास केले आहेत. घरात कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असला, तरी सदर चोरी झालेल्या महेश बेंडले हे अर्ध्या तासासाठीच घरातून बाहेर गेले होते. त्या काळात ही चोरी झाली आहे. महेश यांच्यावर कोणीतरी पाळत ठेऊन केल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com