शहापुरात मोर्चेकरी शेतकऱ्याचा मृत्यू

शहापुरात मोर्चेकरी शेतकऱ्याचा मृत्यू

शहापूर, ता. १७ (बातमीदार) : विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला निघालेल्या लाँग मार्चमधील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा आज (ता. १७) रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली.

शेतकऱ्यांचा लाँग मार्च शहापूर तालुक्यातील वासिंद येथे मुक्कामी आहे. या शेतकऱ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मावडी येथील राहणारे पुंडलिक जाधव हे सहभागी झाले होते. पुंडलिक जाधव यांना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना वासिंद येथून १०८ रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र त्यांनी आपल्याला बरे वाटत आहे. मला वासिंद येथे शेतकऱ्यांकडे जाऊ दे, असे डॉक्टरांना सांगितले. त्यानुसार त्यांना वासिंद येथे पोहोचवण्यात आले; मात्र आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे पुन्हा शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नसून अधिक तपास वासिंद पोलिस करत आहेत, असे सांगण्यात आले.

कांद्याला हमी भाव मिळावा, वनजमिनीचा स्वतंत्र ७/१२ व्हावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, ‘ड’ घरकुलांची किंमत पाच लाख मिळावी, अवकाळीने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, यांसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com