अध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड
अध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड

अध्यक्षपदी संदीप वैद्य यांची निवड

sakal_logo
By

जव्हार, ता. १८ (बातमीदार) : शहराची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या मर्चंट नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून यात संदीप वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मर्चंट सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान गुरुवारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संदीप वैद्य तर उपाध्यक्षपदी लतेश चव्हाण यांची निवड झाली असून ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यात निवडणूक निर्णय अधिकारी भोसले व त्यांचे सहकारी समवेत यावेळी पतसंस्थेच्या सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक अमोल बर्वे, कल्याणी मुकणे, अलताफ मेमन, मकसूद अत्तार, आणि इतर संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.