निवडणुकीच्या तयारीला लागा

निवडणुकीच्या तयारीला लागा

विरार, ता. १८ (बातमीदार) : आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका आपल्याला स्वतंत्रपणे लढायच्या आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी केले. नालासोपारा येथे वसईतील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फाटक बोलत होते.
आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे. या निवडणुका आणि येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या, त्यांच्या समस्या-अडचणी समजून घेण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच वसईच्या दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा व महापालिका निवडणुकांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. तसेच या परिसरात शिवसेना वाढवण्यासाठी, घराघरांत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने प्रयत्न करावेत, अशी सूचना फाटक यांनी यावेळी केली.
पालघर जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याला जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे व अन्य सहकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com