डहाणूत रंगणार स्त्रीरंग महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत रंगणार स्त्रीरंग महोत्सव
डहाणूत रंगणार स्त्रीरंग महोत्सव

डहाणूत रंगणार स्त्रीरंग महोत्सव

sakal_logo
By

कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू समुद्रकिनाऱ्यावर विविध क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच महिलांना स्वयंरोजगार व उद्योगांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी २५ व २६ मार्च रोजी ‘स्त्रीरंग’ या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
डहाणू नगरपरिषद, तलासरी नगरपंचायत यांच्या सहकार्याने व राज्य सरकारच्या मदतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम डहाणू समुद्रकिनारी होणार आहे. या महोत्सवात महिलांच्या सबलीकरणासाठी शासकीय अनेक योजनांची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या न्याय व हक्कांसंबंधित व आरोग्याविषयी जनजागृती करणारे स्टॉल असणार आहेत. तेथे महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरेही भरवली जाणार आहेत. त्याचबरोबर विविध पदार्थांची विक्री करण्यासाठी शंभर स्टॉल भरवले जाणार आहेत. महिलांसाठी विविध मनोरंजत्मक कार्यक्रम व विविध स्पर्धाही घेतल्या जातील, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
आजूबाजूच्या खेडे गावातील महिला एकत्र याव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात येथील प्रसिद्ध वारली चित्रकला, लिप्पन कला, इतर कला व हस्तकला, स्वसंरक्षण, योग, झुंबा, महिला उद्योजकता व शासकीय मदत, यशोगाथा इत्यादी विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यासाठी स्टॉल घेण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.