पोलिसांनी निःपक्षपातीपणे काम करणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी निःपक्षपातीपणे काम करणे गरजेचे
पोलिसांनी निःपक्षपातीपणे काम करणे गरजेचे

पोलिसांनी निःपक्षपातीपणे काम करणे गरजेचे

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : आपल्याला नक्कीच न्याय मिळेल, या दृष्टीने नागरिकांचा पोलिसांवर एक विश्वास असतो. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, या प्रकारचे काम या पोलिस ठाण्याच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीची दखल घेऊन ती योग्य प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न पोलिस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये, अशी पोलिसांची भूमिका असायला हवी, असे प्रतिपादन पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले. नायगाव पोलिस ठाण्याच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते.
वसईजवळील नायगाव पूर्व येथे नव्याने बनवण्यात आलेल्या नायगाव पोलिस ठाण्याचे नुकताच पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलिस आयुक्त श्रीकांत पथक, पोलिस उपायुक्त सुहास बावचे, खासदार राजेंद्र गावित या मान्यवरांसह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेणे गरजेचे असून त्या दृष्टिकोनातून नायगाव परिसरातल्या नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण जवळच व्हावे, यासाठी नायगाव पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

-------------------
दोन पोलिस निरीक्षक, ४३ कर्मचारी
या पोलिस ठाण्यात दोन पोलिस निरीक्षक मिळून १४ पोलिस अधिकारी व ४३ कर्मचारी असा पोलिसांचा ताफा कार्यरत असणार आहे. तसेच या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे असणार आहेत. या नव्याने बनवण्यात आलेल्या पोलिस ठाण्याला कॉर्पोरेट लूक देण्यात आला आहे. त्यामुळे उद्‍घाटनाआधीच हे पोलिस ठाणे चर्चेत आले होते.