
खड्ड्यांविरोधात पायी दिंडी
वाडा, ता. १८ ( बातमीदार) : तालुक्यातील पूर्व भागातील देसई ते बेलवड या रस्त्यांची दुरूवस्था झाली असून या रस्त्यावर वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी (ता. २१) पायी दिडींचे आयोजन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
देसई ते बेलवड या रस्त्याची तात्पुरती डागडुजीपलीकडे काहीही केले जात नसल्याने दरवर्षी या रस्त्याची दुरवस्था होते. रस्त्यावर पडेलेल्या खड्ड्यांचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार पायी दिंडी काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
वाडा पूर्व विभागात देसई, कासघर, शिरसाड, तिळसा, बालिवली, मोज, बिलघर, कंळभे, सोनाळे, निशेत आदी गावे आहेत. या गावांसाठी वाडा-देसई-बेलवड हा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. दरवर्षी रस्त्यावर मलमपट्टी करून करोडोंचा निधी खर्च केला जातो; मात्र यावर ठोस काम केले जात नाही. रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या मंगळवार निशेत ते वाडा अशी पायी दिंडी काढून त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने तहसीलदारांना निवेदनात दिला आहे.
...
ग्रामस्थांचा मोठा सहभाग
वाडा पूर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या वाडा-देसई-बेलवड या मुख्य रस्त्याची दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ही पायी काढण्यात येणार आहे. या पायी दिंडीत शेकडो ग्रामस्थ सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या संयोजकांनी दिली आहे.
...
वाडा : निषेध मोर्चाच्या तयारीसाठी वाडा पूर्व विभागातील कार्यकर्ते एकत्र आले होते.