Wed, May 31, 2023

विस्थापित शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा
विस्थापित शिक्षकांच्या मागण्यांसदर्भात चर्चा
Published on : 18 March 2023, 10:43 am
विरार, ता. १८ (बातमीदार) : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसंदर्भात शिक्षकांच्या मागण्यांसाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. बदल्यांच्या शासन निर्णयातील शिक्षकांच्या मागणीसंदर्भात तसेच वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मंत्री महाजन यांची भेट घेतली. या वेळी आमदार राजेश पाटील यांच्यासह माजी महापौर नारायण मानकर, प्रकाश वनमाळी आणि रमेश कोटी आदी उपस्थित होते. या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.