परिवहन बसचा १८,९०५ रुग्णांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहन बसचा १८,९०५ रुग्णांना लाभ
परिवहन बसचा १८,९०५ रुग्णांना लाभ

परिवहन बसचा १८,९०५ रुग्णांना लाभ

sakal_logo
By

वसई, ता. १८ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाकडून आपल्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या रुग्णांसाठी मोफत परिवहन सेवेचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना याचा फायदा होत असून आतापर्यंत १८ हजार ९०५ लाभार्थी प्रवास करत आहेत. यापुढेदेखील रुग्णांना मोफत बस सेवा मिळावी म्हणून परिवहन समितीची मंजुरी मिळाली असून त्यामुळे प्रवासीसंख्येत वाढ होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कॅन्सरपीडित, डायलेसिस घेणाऱ्या रुग्णांना परिवहन सेवेत मोफत बस पास योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर या सुविधेचा लाभ आजतागायत वसई विरारमधील १८,९०५ लाभार्थी घेत आहेत. लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पासची मुदत ३१ मार्च रोजी संपत असल्याने ही योजना पुढील वर्षातदेखील सुरू राहावी, याकरिता परिवहन समितीची मंजुरी प्राप्त झाली असून प्रभाग समितीमध्ये जाऊन या पास नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन समिती सभापती भरत गुप्ता यांनी केले आहे.